प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- नागपूर पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे वैजापूर पर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे.पूणे व नागपूर पोलीसांचे पथक बुधवारी वैजापूर येथे आले होते.या पथकाने वैजापूर तालुक्यातील चार जणांना ताब्यात घेतले.यातील तिघांचा नागपूर फुटी प्रकरणात समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.तिघे आरोपी हे वैजापूर तालुक्यातील संजरपूरवाडी येथील रहिवासी आहेत.सुनिल कल्याण नागलोत,शेलार कारभारी काकरवाल,अर्जून चुडामल जारवाल तसेच जयलाल कारभारी काकरवाल अशी पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत