Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डिपि तीन महिन्यांपासून जळाल्याने नागरीकांची गैरसोय



 प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

    वैजापूर- तालुक्यातील नगिना पिंपळगाव येथील गुंजाळ वस्ती सिंगल फेज डिपि तीन महिन्यांपासून जळाल्याने या भागातील नागरीकांची गैरसोय होत आहे.या सिंगल फेज डिपिवरून शेतकऱ्यांच्या विज पंपांना ही विजपुरवठा असल्याने त्यांची पिके करपली आहेत.या सिंगल फेज डिपीला कमी दाबाने विज पुरवठा होत असल्याने तो वारंवार जळत आहे.शेतकऱ्यांना पदरमोड करून त्याची दुरुस्ती करावी लागते.तुटलेल्या तारा,फ्यूज,डिपीला लागणारे ऑईल हे शेतकऱ्यांना स्वखर्चाने बदलावे लागते.या सिंगल फेज डिपीला तीन गट्टू असून एक एक गट्टू सतत छळत असतो. या डिपीवर अतीरीक्त दाब झाला असून अधिकारी व कर्मचारी मात्र इकडे फिरकत नसल्याने शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

        महावितरणकडून या भागात केल्या जाणाऱ्या कमी दाबाच्या विजपुरवठ्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.विहीरीत पाणी असुनही विजेच्या लपंडावाने पिकांना पाणी देता येत नसल्याने नैसर्गिक आपत्ती बरोबरच महावितरण निर्मीत आपत्ती शेतकऱ्यांवर ओढावली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.सध्या गहू,हरभरा ,कांदा,ज्वारी ,ऊस आदी पिके घेण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.कांदा लागवड केल्यानंतर लगेच पाणी देणे आवश्यक असते.एकतर कांदा लागवडीला मजूर मिळत नाही.त्यात मिळालेच तर विज पुरवठा खंडीत झाल्यावर पाणी मिळत नाही.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची नवीन लागवड झालेला नविन कांदा वाळून गेला आहे.तरी सुद्धा महावितरणचे अधिकारी व कर्मचारी लक्ष देण्यास तयार नाही.त्यामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे.