महेश साळुके प्रतिनिधी निफाड तालुका
लासलगाव- दी.3जाने येथील श्री महावीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बालिकादिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताच्या प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिकादिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लासलगाव येथील महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सौ.वेदिकाताई होळकर यांनी भूषविले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. वेदिकाताई होळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनिल आब्बड, समाजसेविका भारतीताई ब्रम्हेचा, वैशाली जाधव, काझी भाभी, आरोग्यसेविका वैशालीताई दहिफळे, अंगणवाडी सेविका सविता चव्हाण, सविता पवार हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यालयाचे प्राचार्य कैलास भारती यांनी केले.
विद्यालयाचे संगीतशिक्षक सचिन आहेर व गीतमंचाने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ओवी सादर केली. विद्यालयाची विद्यार्थिनी रिया बोरसे हिने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा सादर केली. विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती गायत्री पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती सांगितली. विद्यार्थिनींची भाषणे झाली. सौ. वेदिकाताई होळकर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थिनींना बालिकादिनाच्या शुभेच्छा दिल्या व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका श्रीमती त्रिवेणी जाधव यांनी केले.तर आभार प्रदर्शन उपशिक्षिका श्रीमती तनुजा घुमरे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या शिक्षिका सौ. हर्षदा कदम, श्रीमती माधुरी पाटील, प्रज्ञा काळे,जयश्री घोटेकर व सर्व शिक्षिका यांनी मेहनत घेतली.त्यांना विद्यालयाचे पर्यवेक्षक सतिष पवार, विभागप्रमुख योगेश जैन ,गोरख संगमनेरे व सेवक सुभाष शेजवळ, भाऊसाहेब चव्हाण यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.