प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-बेकायदेशीर रित्या पिक अप मध्ये ३५वासरे घेऊन जाणाऱ्या एका जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.निजाज अहमद फकीर महंमद शेख रा.श्रीरामपूर असे आरोपीचे नाव आहे.शेख हा त्याच्या पिक अप मधून (एम एच १६ ए ई २४८०) ३५ वासरे श्रीरामपूर येथून भरून लासूर स्टेशन येथे विक्री करण्यासाठी घेऊन जात होता. शिवूर पोलीसांनी ही माहिती मिळाल्या नंतर शिवूर पोलीस स्टेशन जवळ पिक अप व्हॅन पकडण्यात आले.सदर गाडी व वासरे पोलीसांनी ताब्यात घेतले असून सदर वासरे गोशाळेत पाठविण्यात आले आहे.या प्रकरणी शिवूर पोलीस ठाण्यात शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.