देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी
पत्रकार हे समाज घडवणारे माध्यम आहेत या माध्यमांना लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभ असे म्हणले जाते पत्रकार हा समाजाचा आरसा आहे ज्या पूरस्थिती तही सत्य प्रकट करत असतो असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे यांनी पत्रकार दिनानिमित्त देवळगाव राजा इथे पत्रकारांचा सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना सांगितले
यावेळी पत्रकारांनी डोळे व कान उघडे ठेवून सामान्य जनतेसाठी आपली लेखणी वापरावी असे मत त्यांनी व्यक्त केले आहे यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील मतकर सुरज गुप्ता गजानन घुगे गजानन तिडके गजानन भालेकर प्रदीप हिवाळे अमोल बोबडे मुबारक शाह शिवाजी वाघ राजेश खांडेभराड संतोष जाधव मुशिर कोटकर प्रभाकर मांडे राजेश पंडित विलास जगताप तसेच मातृतीर्थ पत्रकार संघ चे अध्यक्ष अश्रफ पटेल सुषमा राऊत ओम पराड प्रकाश साखला रवींद्र जाधव आदी पत्रकार उपस्थित होते पत्रकारांचा गुलाबाचे फुल व पेन देऊन सत्कार करण्यात आला