प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- मुलगी झाली म्हणून अंगणवाडी सेविकेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घराबाहेर काढून दिल्याची घटना तालुक्यातील पालखेड येथे घडली.या प्रकरणी सात जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.
नागमठाण येथील जया (२७) हिचे तालुक्यातील पालखेड येथील संजय भाऊसाहेब शेलार याच्याशी २०१२ साली लग्न झाले होते.लग्नानंतर पाच वर्षांनी मुलगी झाल्यावर सासरची मंडळी तिला त्रास देऊ लागले.घरखर्चासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन ये.अशी मागणी तिच्या कडे करण्यात आली.तसेच दुसरे लग्न करायचे आहे.त्यामुळे तुला जिवे मारतो.अशी धमकी पती संजय शेलार याने दिली.या छळाला कंटाळून ज्या हिने पोलीस ठाणे गाठून आपली फिर्याद दिली.या प्रकरणी जया हिने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती संजय शेलार, विमलबाई भाऊसाहेब शेलार, भाऊसाहेब दगडू शेलार सर्व रा.पालखेड,अनिता विलास खरात व विलास साहेबराव खरात रा.रुई ता.राहता,सुनिता सुनिल रोकडे व सुनिल जनार्दन रोकडे रा.डागपिंपळगाव या सात जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.