प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-रस्ता दुरूस्तीच्या सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तीन जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शनिवारी मुंबई नागपूर महामार्गावर बोर दहेगाव शिवारात घडली. मुंबई नागपूर महामार्ग हा काही वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला आहे.पुर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता.या मार्गावर बोर दहेगाव शिवारात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.तेथील शेतकऱ्यांचा भुसंपादनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने शेतकरी रस्ता दुरुस्ती करून देत नाही.त्यामुळे या शिवारात रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहे.तसेच शेतकरी या खड्ड्यात पाणी सोडतात.
त्यामुळे अपघात होत आहेत.याची माहीती मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक प्रबंधक महेश पाटील व सर्वेयर सचिन कोटमे हे जेसीबी घेऊन या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आले.परंतू तेथील तीन शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले.आमचा भुसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्याशिवाय आम्ही काम करू देणार नाही.असे म्हणत ते जेसीबी समोर झोपले.तसेच आम्ही विष पिऊन जिव देतो अशी धमकी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून महेश पाटील यांनी फिर्याद दिली.त्यानुसार माणिकराव लक्ष्मण उगले,संतोष माणिकराव उगले व गणेश माणीकराव उगले तिघे रा.बोर दहेगाव या तीन जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आ