प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- जुन्या वादातून तिन जणांनी काठी व गजाने एका कुटुंबावर हल्ला केला.या हल्ल्यात एका महीलेसह तिन जखमी झाले.ही घटना तालुक्यातील धोंदलगाव येथे ११ जानेवारी रोजी घडली .या प्रकरणी तीन जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धोंदलगाव येथील बाळासाहेब कचरू चन्ने हे गट नंबर ७३९ मधील शेतात राहतात.त्यांच्या शेजारी शिवाजी शेकू साखरे हे राहतात.त्यांचा जुना वाद आहे.या वादातून साखरे कुटुंबातील तिघे ११ जानेवारी रोजी रात्री गज व काठ्या घेऊन चन्ने यांच्या घरी गेले.
त्यांनी काही कळण्याच्या आत चन्ने कुटुंबावर हल्ला केला.गज व काठीने जबर मारहाण करून त्यांनी बाळासाहेब चन्ने,त्यांचा मुलगा गणेश चन्ने व पत्नी उर्मिला चन्ने यांना जखमी केले.तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.जखमी चन्ने कुटुंबावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.या प्रकरणी गणेश चन्ने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी शेकून साखरे, मच्छिंद्र शेकू साखरे व सुनिल शिवाजी साखरे सर्व रा.धोंदलगाव या तिन जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.