प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते येथील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला.यावेळी विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५१ जणांना हा पुरस्कार देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन संजय निकम , धोंडिरामसिंग राजपूत,श्रमिका दळवी , उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्राजापती, मारोती देसाई , पवन कापरे सर ,समाधान पाटील , गोकुळ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक सुर्यकांत मोटे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा सचिव सुर्यकांत मोटे यांनी केले होते. याप्रसंगी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक,कवि, पत्रकारिता पोलिस पाटील,तसेच इंजिनिअर, डॉक्टर, तंत्रज्ञान, कृषि व उत्कृष्ट प्रशासकीय आदि क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या ५१ जाणाचा गौरव पत्र, सन्मान चिन्ह,शाल , पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्राजापती , डॉ.सुनिता चव्हाण, विशाल हिवाळे, सिद्दीकी, विश्वास इंगळे,अकबर शेख, राजीव थिटे , मारोती देसाई , अशोक कुंभार, इंदुमती कदम,मनिषा शिंदे, ऊषा कांबळे, वसुधा नाईक,संगीता बनकर, ताज खान पठाण, अशोक जाधव,रिकबचंद पाटील, समाधान शिंदे, मकरंद कुलकर्णी, हसन सय्यद,विजय मोगल, राहुल त्रिभुवन, बाबासाहेब वाघ, कारभारी निगोटे, निरंजन गायकवाड वासुदेव बोर्ड, कैलास कदम, प्रभाकर जाधव,आनिता सूर्यवंशी, वंदना चव्हाण आदिंना हा पुरस्कार देण्यात आला.