प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तालुक्यातील शिवराई येथील महीलेचा मृतदेह एका विहीरीत आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.कल्पना संदीप कदम (३५) असे मयत महिलेचे नाव आहे.कुंजखेडा ता.कन्नड येथील हिराबाई (माहेरचे नाव) हिचा विवाह शिवराई येथील संदीप याच्याशी विवाह झाला होता.कल्पना ही १६ जानेवारी पासून बेपत्ता होती.या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.बुधवारी सकाळी शिवराई शिवारातील एका विहीरीत हिराबाई यांचा मृतदेह आढळून आला.वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.मात्र सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा .तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरच्या मंडळींनी नकार दिला.पतीच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.रात्री उशीरापर्यंत वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.