महेश साळुंके निफाङ तालुका प्रतिनिधी
लासलगाव – निफाड तालुक्यामध्ये या वर्षी आजपर्यंतच्या सर्वात निच्चांकी म्हणजेच ४.५ अंश तापमानाची नोंद झाली तसेच लासलगावचे तापमान ५.५ झाले असुन. थंडीचा जोर वाढल्याने द्राक्ष पीक धोक्यात आले तर गहू, हरभरास पोषक आहेत. दुभत्या जनावरांवर या कडाक्याच्या थंडीचा परिणाम होऊन दूध संकलनावर होत आहे.
यावर्षी द्राक्ष हंगामात पारा घसरून द्राक्ष पिकाला या थंडीचा मोठा फटका बसत द्राक्क्षांवर बुरशी जन्य रोगांचा प्रादुर्रभाव झाला असुन द्राक्षमणी पॕरालाईज होत आहे फुगवण थांबली असुन घङावरील मणी गळत आहे . अशी माहिती लासलगाव येथील कृषी तज्ञ सचिन होळकर यांनी दीली असुन थंडीत वाढ झाल्याने व धुके असल्याने द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. द्राक्षबागा या अतिशय कडाक्याच्या थंडीमुळे सुप्तावस्थेत जात आहे. बागांची मुळे व पेशींचे कार्य मंदाऊन त्याचा परिणाम द्राक्ष घडांवर होत त्यांचा विकास थांबला आहे.
तसेच कांदा पिकावरही याचा मोठा फटका बसला आहे या कडाक्याच्या थंडीवर उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागेत शेकोटी करवी तसेच पहाटेच्या वेळी अत्यंत अल्प प्रमाणात ठिबक सिंचन अथवा संपुर्ण बागेला पाणी देणे अशी उपाययोजना करावी. गहू, हरभरा या रब्बी पिकांना अतिशय पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गहू, हरभरा या पिकांना थंडी पोषक असते व पिकांवर कोणतेही रोगाची लक्षणे दिसून येत नाही. लासलगावकरांना गुलाबी थंडीचा विलक्षण अनुभव येत आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात रोज तापमान घेतले जाते. गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात तापमान घसरत गेले व २५ जानेवारी रोजी तापमान थेट ४.५ अंशांवर घसरल्याने या वर्षीच्या आजपर्यंतच्या सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.