नाशिक प्रतिनिधी भुषण वाघ
पालकमंत्री मा भुजबळ साहेब यांच्या हस्ते, जिल्हाध्यक्ष रविंद्र (नाना)पगार यांच्या मार्गदर्शनाने, युवक जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, बागलाण चे माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, माजी आमदार दिपीकाताई चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भुजबळ फार्म येथे बागलाण तालुका ओबीसी सेलचे सुरेश अहिरे यांचेसह मोरे नगर परिसरातील असंख्य कार्यकर्ते तसेच चौंधाने येथिल माजी सरपंच प्रकाश दौलत मोरे यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी भुजबळ साहेबांनी सांगितले की देशांतील अनेक पोटनिवडणुका तसेच युपी मधील मंत्री, आमदार यांचे राजीनामे हे संकेत बघता भाजप सरकार हे भेदरलेले दिसुन येत आहे. सगळीकडे वातावरण बदललेले आपणास थोड्याच दिवसात दिसुन येईल सर्व प्रवेश कर्त्यांचे पक्षात सन्मान पुर्वक स्वागत आहे.
या प्रसंगी, सटाणा माजी नगराध्यक्ष पांडुनाना सोनवणे, युवक उपजिल्हाध्यक्ष गणेश पवार, किरण भुसारे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सुयोग अहिरे,अरूण सोनवणे,अनिल चव्हाण, बाळासाहेब देवरे, परेश देवरे, चेतन देवरे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.