महेश साळुंके प्तिनिधी निफाङ तालुका
विंचुर तालुका निफाड - सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल येथे मोजक्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साधेपणाने साजरा करण्यात आला राहीमाधव फाउंडेशनच्या वतीने सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ आणि खेळणीचे वाटप करण्यात आले, भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी योगदान दिले असून बलिदान दिले आहे यासाठी विद्यार्थ्यांनी देशाप्रती अभिमान बाळगून राष्ट्रनिर्मितीसाठी भविष्यात योगदान द्यावे असे आवाहन मान्यवरांनी केले तसेच प्रजासत्ताकदिनी सुनिता कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचा बेचाळीसावा वर्धापन दिन असल्याने संस्थेच्या प्राचार्य सौ. शकुंतला जगदाळे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या, त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिक्षिका यशोदा जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले, ऋतुजा गाडे, नेहा राणे यांनी सूत्रसंचालन केले आदिती जगदाळे आणि संध्या महाले यांनी आभार मानले.