प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
शासनाची कुठलीही परवानगी न घेता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसवल्याची घटना शुक्रवारी आघुर (ता. वैजापूर) येथे उघडकिस आली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी आघुरचे ग्रामसेवक कचरु पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आघुर ग्रामपंचायतींच्या हद्दीत दलित वस्तीमध्ये समाज मंदिराच्या समोरच्या जागेत कुणीतरी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बसवला आहे अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती.
या माहितीची खातरजमा करण्यासाठी ग्रामसेवक पवार यांच्यासह सरपंच आप्पासाहेब आव्हाळे, ग्रामपंचायत कर्मचारी सागर सोळसे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी दलित वस्तीमध्ये समाज मंदिराच्या समोर पुर्णाकृती बसवल्याचे आढळुन आले. याबाबत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी चर्चा केली असता कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हा पुतळा बसवल्याचे दिसुन आले. त्यामुळे याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर अनोळखी व्यक्ती विरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.