Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जुगार अड्डा चालविणाऱ्या दोन जणांना छापा मारून अटक



 प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

        वैजापूर- शहरात जुगार अड्डा चालविणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून अटक केली.त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य असा एकूण २ हजार २०५ रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.रमेश बाळासाहेब पानगव्हाणे व इस्माईल मोहंमद शहा दोघेही रा.वैजापूर अशी आरोपींची नावे आहेत.दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ही कारवाई करण्यात आली.

        शहरात कल्याण  व मिलन डे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.त्या आधारे काॅन्सटेबल ज्ञानेश्वर मेटे व पोलीस नाईक वाल्मीक निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली.शहा हा लाडगाव चौफुलीवर व पानगव्हाणे हा नवीन बसस्थानक परिसरात जुगार खेळत व खेळवीत होता.दोन्ही आरोपी विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.