सटाणा ता. बागलाण प्रतिनिधी भुषण वाघ
दिनदर्शिकेचे उद्घाटन बागलान चे आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले, विमोचन प्रसंगी श्री. बोरसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय ची दिनदर्शिका ही खरोखरच स्तुती योग्य आहे या दिनदर्शिके मध्ये फक्त तारखा नसून बागलाण तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशा अधिकाऱ्यांचा जीवन परिचय त्यामध्ये समाविष्ट केला आह, त्यामुळे ही दिनदर्शिका नसून यशस्वी जीवनाकडे वाटचाल करणारा पथदर्शक आहे असे नमूद केले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांनीही आपल्या भाषणात वाचन संस्कृती जोपासणे चे कार्य या वाचनालय कडून चांगल्या रीतीने पार पाडले जात आहे असेच यशस्वी वाटचाल वाचनालयाने चालू ठेवावी असे मनोगत व्यक्त केले .
याप्रसंगी प्रकाशन सोहळा साठी आलेल्या सर्व मान्यवरांचे पुस्तकाने व एक झाड देऊन यथोचित सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना पोपटराव बच्छाव विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे अनेक उपक्रम करण्याचा मानस वाचनालयाच्या वतीने करण्यात येईल. याप्रसंगी माजी नगरसेवक काका सोनवणे, दिलीप सोनवणे, दीपक पाकळे , वाचनालयाचे अध्यक्ष किरण बच्छाव , योगेश धिवरे, योगेश पवार, घनश्याम निकम, राकेश बच्छाव इत्यादी हजार होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भास्कर सोनवणे व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किरण पोपटराव बच्छाव यांनी केले.