Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पोटनिवडणुकीत उमेदवारांचा बिनविरोध विजय

 



प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

        वैजापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या नागरिकांचा मागास प्रवर्गातील रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण करुन पोटनिवडणुक घेण्यासाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या जागांसाठी १८ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. मात्र या सहा जागा बिनविरोध निवडुंग आल्याचे निवडणुक विभागातर्फे सांगण्यात आले. वैजापूर तालुक्यातील वैजापूर ग्रामीण दोन, हनुमंतगाव, नादी, गोळवाडी-मिरकनगर, खिर्डी-हरगोविंदपुर या पाच ग्रामपंचायतीमधील नागरिकांचा मागास प्रवर्गातील सहा जागा निधन, राजीनामा, अनहर्ता व अन्य कारणांमुळे रिक्त झाल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयात दाखल विविध रिट याचिकांमध्ये १५ डिसेंबर २०२१मध्ये झालेल्या निर्णयानुसार, नामाप्रच्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण करुन पोटनिवडणुक घेण्यासाठी १८ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेऊन त्यानंतर सर्वसाधारण जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली. २८ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. सहा जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख होती.

         वैजापूर ग्रामीण दोन ग्रामपंचायतीत दोन उमेदवारी अर्जांपैकी एकाने माघार घेतल्याने सिंधुताई अर्जुन शेळके या बिनविरोध निवडुन आल्या. हनुमंतगाव ग्रामपंचायतीत अनिता सुभाष शेलार, नादी ग्रामपंचायतीत रुपाली शिवाजी लांडे, गोळवाडी-मिरकनगर ग्रामपंचायतीत सागर रामकिसन वाघचौरे, पुजा राजेंद्र छानवाल व खिर्डी-हरगोविंदपूर या गट ग्रामपंचायतीत मधुकर मुरलीधर शिंदे हे उमेदवार बिनविरोध निवडुन आले. या सर्व ठिकाणी एका जागेसाठी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते.