Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय क्रांतीज्योती फुले जयंती सप्ताह साजरा



 प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

    वैजापूर- तालुक्यातील महालगाव  येथील श्री संत जनार्दन स्वामी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सप्ताह साजरा झाला. सावित्रीबाई फुले यांनी असंख्य अडचणींवर मात करत करून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. त्यांच्या जन्म शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने 3 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्र लेकीचा अभियान गुरुकुलात राबविण्यात येत आला. या उपक्रमाअंतर्गत वेशभूषा स्पर्धा, पाककला स्पर्धा, भाषण व गायन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. वेशभूषा स्पर्धेमध्ये एकूण  35 मुले व मुलींनी सहभाग घेतला.अनेक विद्यार्थ्यांनी विविध शूर महिलांच्या वेशभूषा केले होत्या. त्यामध्ये प्राथमिक गटात प्रथम क्रमांक आरती दादासाहेब बुट्टे ,द्वितीय क्रमांक मानसी नंदु निकम, तृतीय क्रमांक स्नेहा सुनील मतकर यांचा क्रमांक आला.  तर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक वैभवी रतन गंडे, द्वितीय क्रमांक वैष्णवी गंगाधर बुट्टे, तृतीय क्रमांक आरती बाबासाहेब गुडदे यांचा आला.सदर स्पर्धा घेण्यासाठी  खिल्लारे के पी व  चौधरी बी एम यांनी काम पाहिले. 
    त्याचबरोबर पाककला स्पर्धा घेण्यात आल्या.त्यामध्ये 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ स्वतः बनवून आणले .सुंदर सजावट करून मांडणी केली. त्यामध्ये प्राथमिक गटांमध्ये प्रथम क्रमांक धनश्री नारायण सुरासे ,द्वितीय क्रमांक साई संभाजी टेमकर, तृतीय क्रमांक श्रावणी तुकाराम कांगुने तर प्रोत्साहनपर बक्षीस ओंकार रजनीकांत नजन व शिवानी गणेश तोगे यांनी मिळवले .तसेच माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक कुमारी दिव्या विष्णू शेळके,द्वितीय क्रमांक रोहित नानासाहेब झिंजुर्डे,तृतीय क्रमांक सृष्टी रमेश गायकवाड यांनी मिळवले प्रोत्साहनपर बक्षीस दिव्या दौलत गंडे व प्रणिता रामनाथ बाजारे यांनी मिळवले. सदर स्पर्धा  मोरे पी पी व  भंडारे ए.डी. यांनी पार पाडली व परीक्षक म्हणून मुख्याध्यापक  ढोबळे डी एस व वाघ  एन के यांनी काम पाहिले. 
    रांगोळी स्पर्धेमध्ये एकूण 38 विद्यार्थिनींनी भाग घेतला मुलींसोबत मुलांनीही अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या. या स्पर्धेमध्ये प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक श्रावणी तुकाराम कागुंने,द्वितीय शिवानी गणेश तोगे, तृतीय कृतिका अनिल रासने व मयुरी अक्षय वाघ यांनी मिळवला. तर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक दिव्या ज्ञानेश्वर पवार, द्वितीय क्रमांक अमृता चंद्रभान गुडदे,तृतीय क्रमांक शीतल दादासाहेब गायकवाड व  दिव्या झिंजुर्डे यांनी मिळवला.
सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी  रामटेके एम एम व  कुभांडे के एन यांनी काम पाहिले. 
त्याच बरोबर गायन व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांनी विविध गीते  सादर केली उत्साहात भाषणे केली. त्यामध्ये  प्रथम क्रमांक अमृता गणेश गायकवाड, द्वितीय क्रमांक दिव्या प्रकाश झिंजुर्डे ,तृतीय क्रमांक शिवांजली नवनाथ चव्हाण तर गीत गायन स्पर्धेमध्ये प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक अमृता चंद्रभान गुडदे, द्वितीय क्रमांक धनश्री नारायण सुरासे,तृतीय क्रमांक शरयू भारत गंडे व माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक तेजश्री नारायण सुराशे, द्वितीय क्रमांक सानिका भागीनाथ झिंजुर्डे,तृतीय क्रमांक निकिता बाबासाहेब गायकवाड यांनी मिळवला.सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी  क्षीरसागर डीबी व  निकम एम आर यांनी परिश्रम घेतले
यानंतर  शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला सुरुवातीला आश्रमाचे प्रमुख श्री स्वामी नामदेव गिरीजी महाराज यांनी श्री बाबाजी च्या प्रतिमेचे पूजन केले. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व मुख्याध्यापक  ढोबळे डी.एस.यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष  सहशिक्षिका  खिल्लारे के. पी.या होत्या .तर सूत्रसंचालन  चौधरी बी.एम.यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व राजू माळी यांनी परीश्रम घेतले.
सर्व विद्यार्थ्यांचे अध्यक्ष श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज व संस्थेचे सचिव  गणेश बोराडे यांनी अभिनंदन केले