सटाणा तालुका बागलान प्रतिनिधी भूषण वाघ
औरंगाबाद येथे MIM खासदार इम्तियाज जलील यांनी क्रांतिसूर्य महाराणा प्रताप यांच्या स्मारकाला विरोध केल्याने या संदर्भात खासदार जलील यांचा निषेध नोंदवण्यात आला.
सटाणा शहरात दोधेश्वर नाका येथे परिसरात एम आय एम खासदार जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली करणी सेना तालुका अध्यक्ष श्री ठोके यांनी खासदार जलील यांचा निषेध व्यक्त करत पुतळा जाळण्यात आला करणी सेनेचे बहुसंख्य सदस्य तसेच राजपूत बांधव यावेळी उपस्थित होते. पुतळा फुंकल्यानंतर उपस्थित करणी सेना सदस्यांनी तहसिल कचेरी पर्यंत मोर्चा काढून तहसीलदारांना खासदार जलील यांच्या विरोधात निवेदन देण्यात आले.