Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संतापलेल्या खातेदाराने बॅकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा



प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

        महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वैजापूर शाखेने एका खातेदाराची बचत खात्यातील रक्कम परस्पर कर्ज खात्यात वर्ग केली.त्यामुळे संतापलेल्या खातेदाराने बॅकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. तालुक्यातील लाडगाव येथील शेतकरी नासेर सुभान अली सय्यद या शेतकऱ्याचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वैजापूर शाखेत बचत तसेच कर्ज खाते देखील आहे.त्यांनी घरखर्च व औषधोपचारासाठी बचत खात्यात ४० हजार रुपये ठेवलेले होते.

        त्यांना या रकमेची गरज पडल्याने ते बॅंकेत रक्कम काढण्यासाठी गेले.मात्र त्यांच्या खात्यावर रक्कम नसल्याचे दिसून आले.ही रक्कम परस्पर कर्ज खात्यात वर्ग केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले.   कुठलीही सुचना न देता बँकेने 39 हजार रुपये कपात केले. ही  रक्कम परत न मिळाल्यास ४ जानेवारी रोजी बॅकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा नासेर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.