Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वैजापुरात डॉ. आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण


 


प्रतिनिधि वैजापूर भारती कदम


डॉ. आंबेडकरांना जातीच्या बंधनात अडकवू नका"


        भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकांना न्याय देण्यासाठी जीवन वेचले. राज्यघटनेची निर्मिती केली. त्यांचे कार्य प्रत्येक भारतीयासाठी आहे. त्यामुळे अशा महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवु नका. त्यांचे विचार आचरणात आणल्यास खऱ्या अर्थाने पुतळा उभारण्याचे कार्य सार्थकी लागेल असे विचार प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केले. वैजापूर शहरात नगरपालिकेतर्फे दहा लाख पंधरा हजार हजार रुपये खर्चुन पंचधातुचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. 

        या पुतळ्याचे अनावरण शनिवारी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रमेश बोरनारे हे होते. पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पुतळा परिसरात नागरिक एकत्र आले होते. यानंतर ठक्कर बाजार परिसरात झालेल्या जाहीर सभेला कॉंग्रेसचे जेष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे, उपनगराध्यक्ष साबेर खान, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी,  एकनाथ जाधव, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, अकिल शेख, डॉ. व्ही.जी. शिंदे, माजी उपनगराध्यक्ष मजीद कुरेशी, सेवानिवृत्त न्यायाधिश एस.एस. साळवे, पुतळा समिती सदस्य सी.बी‌ थोरात, गोपीनाथ थोरात, विठ्ठल साळवे, खुशालसिंह राजपूत या मान्यवरांची उपस्थिती होती. सेवानिवृत्त न्यायाधिश साळवे यांच्या पुढाकारातुन १९७९ मध्ये वैजापूर शहरात डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र हा पुतळा जीर्ण झाल्याने वैजापूरच्या नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी सर्वांना सोबत घेऊन नविन पंचधातुचा पुतळा उभारण्याची आखणी केली. महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवण्याची आजकाल फॅशन झाली आहे. प्रत्यक्षात डॉ.‌बाबासाहेब आंबेडकर यांंनी वंचित घटकांना न्याय देण्यासाठी कार्य केले. त्यामुळे त्यांना विशिष्ट जातीधर्माच्या चौकटीत अडकवु नका असे आवाहन जेष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे यांनी केले. भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही डॉ.बाबासाहेबांबद्दल विस्तृत विचार मांडले. पुतळे उभारताना महापुरुषांच्या विचारांचे पालन करणेही गरजेचे आहे असे मत आमदार बोरनारे यांनी व्यक्त केले.