प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- येथील जे. के. जाधव महाविद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 28वा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. विष्णू भिंगारदेव हे होते. याप्रसंगी विद्यापीठाचा ध्वज फडकावून ध्वजारोहण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राचार्य भिंगारदेव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या चळवळीत शाहिद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून, मराठवाडा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील उच्च शिक्षणात विद्यापीठाने निभावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचे वर्णन आपल्या मनोगतामध्ये केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनिल कोतकर, प्रा. अनिल मतसागर, प्रा. संदिप राऊत, प्रा. गवळी , प्रा. जगताप एस ई., प्रा. शिंदे एस. ए., शहाजी पगारे, प्रशांत गायकवाड, प्रकाश सोनवणे, सुनंदा कांबळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज साळुंके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुनिल कोतकर यांनी केले.