Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

15 ते 18 वयोगटातील आपल्या पाल्यांचे लसीकरण करुन घ्या – आ.ॲड.आकाश फुंडकर



प्रतिनिध विठ्ठल गावंडे

        पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नुकतेच जाहीर केल्या प्रमाणे देशभरातील 15 ते 18 वयोगटातील मुल-मुलींना कोव्हॅक्सीन लसीकरण करण्यात येणार आहे.  आज खामगांव येथे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते या लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला व लसीकरणासाठी आलेल्या युवा मुलांमुलींना पुष्पगुच्छ़ देऊन या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलतांना आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले की, कोरोना या महामारीपासून आपल्या 15 ते 18 वयोगटातील पाल्यांना सुरक्षीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हा ऐतिहासिक  निर्णय जाहीर केला.  त्यानुसार सर्वांनी उपरोक्त़ वयोगटातील पाल्यांना लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे असे असे आवाहन आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केले आहे.
 
        जगभरात  दिवसे दिवस कोरोना महामारीचे नवनवीन व्हेरियंट पहायला  मिळत आहेत. त्यामुळे देशातील 18 वर्षाखालील म्हणजेच वय वर्ष 15 ते 18 वर्ष वयोगटातील पाल्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नुकतेच व्हॅक्सीनेशन करण्याबाबत जाहीर केले आहे.  त्यानुसार आज  दि.03 जानेवारी 2021 रोजी संपुर्ण देशभरात व्हॅक्सीनेशन सुरु झालेले आहे.  यामध्ये आपण ऑनलाईन नोंद करुन उपलब्ध स्लॉट प्रमाणे  किंवा जवळच्या व्हॅक्सीनेशन सेंटरवर प्रत्यक्ष् जाऊन देखील व्हॅक्सीनेशन करुन घेऊ शकतो.  आपल्या पाल्यांना कोरोना महामारीपासून सुरक्षीत करण्यासाठी मतदार संघातील सर्व पालकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या पाल्यांचे मोठया प्रमाणात व लवकरात लवकर व्हॅक्सीनेशन करुन त्यांना पुढे येणाऱ्या संकटांपासून सुरक्षीत करा.
भारतात सर्वात जास्त़ प्रमाणात लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे.  जवळपास 60 कोटी लोकांचे दोन्ही डोस पुर्ण झालेले आहेत. तर देशात एकुण 146 कोटी डोज देण्यात आले आहेत.  एका  दिवसात जवळपास 2.50 कोटी व्हॅकसीनेशन करण्याचा रेकॉर्ड देखील भारताने केला आहे.  कोरोना महामारीवर भारतात तयार झालेली कोव्हॅक्सीन व कोव्हीशील्ड या लसी चांगल्या प्रभावी आहेत.  यासंधीचा फायदा घेऊन सर्वांनी कोरोना महामारी  विरोधात लढण्यासाठी व्हॅक्सीनेशन करुन घ्यावे असे आवाहन आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केले.
 यावेळी खामगांव सामान्य् रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ  निलेश टापरे, रुग्ण् कल्याण समितीचे श्री राम  मिश्रा, नगेंद्र रोहणकार, श्री देशमुख यांचेसह संबंधीत डॉक्टर्स व नर्सेस उपस्थ‍ित होते.