महेश साळुंके प्रतिनिधी निफाङ तालुका
लासलगाव दी १२ लासलगाव येथील सेव्हन्थ डे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षण घेत असलेल्या १४ वर्षीय विद्यार्थ्यास बाजारात जाऊ अशी फूस लावून बाजारात न जाता जीवेठार मारण्याचा उद्देशाने मोटारसायकलवर
बसवून नंदुरबारकडे नेताना त्याच्या वडीलांनीच त्यास ढकलून दिल्याची घटना दि २१ डिसेंबर रोजी लासलगाव येथे घडली होती.या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलीस ठाण्यात दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली होती त्यानुसार लासलगाव पोलीस ठाण्यात बुधवारी ती फिर्याद वर्ग करण्यात आल्याने सदर विद्यार्थ्याच्या वडीलांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठार मारण्याचा उद्देशाने मोटारसायकलवर बसवून नंदुरबारकडे नेताना त्याच्या वडीलांनीच त्यास ढकलून दिल्याची घटना दि२१ डिसेंबर रोजी लासलगाव येथे घडली होती.या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलीस ठाण्यात दिनांक ३जानेवारी २०२२ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली होती त्यानुसार लासलगाव पोलीस ठाण्यात बुधवारी ती फिर्याद वर्ग करण्यात आल्याने सदर विद्यार्थ्याच्या वाडीलांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव येथील सेव्हन्थ डे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जोएल विनोद नाईक हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे.तो त्याच्या आई समवेत राहतो २१ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्याचे वडील विनोद रामसिंग नाईक राहणार नागरे,तालुका नवापूर,जिल्हा नंदुरबार यांनी जोएल यास बाजारात जाऊ अशी फूस लाऊन मोटरसायकलवर बसवले व बाजारात न जाता जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मोटरसायकलवर बसवून नवापूरच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली.त्याक्षणी त्यांचा मुलगा जोएल याने त्यांना विरोध केला असता विनोद नाईक यांनी मोटरसायकलवरून मुलगा जोएल यास ढकलून दिल्याने त्याचे हात पाय मोडून दुखापत झाली आहे.याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलीस कार्यालयात दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली असता ती लासलगाव पोलीस कार्यालयात बुधवारी वर्ग करण्यात आली.त्यानुसार विनोद रामसिंग नाईक यांच्या विरुद्ध भादंवि ३०७ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.या प्रकरणी निफाड चे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे,लासलगावचे स पो निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि रामकृष्ण सोनवणे तपास करीत आहेत