Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुचाकीवरून अवैध रित्या गुटखा नेणाऱ्या इसमाला जलंब पोलिसांनी पकडले..1 लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त...



बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल गावंडे

        जलंब  दुचाकीवरून अवैध रित्या गुटखा नेणाऱ्या 25 वर्षीय युवकाला जलंब पोलीसांनी पकडले आहेत सदर घटना दुपारी जलंब -शेगाव रोडवर नाकाबंदी दरम्यान श्री पाई विदयालयाजवळ आज दि.5 जानेवारी रोजी घडली. या बाबत वृत्त असे कि जलंब पोलिसांनाच गुप्त माहिती मिळालीकी जलंब ते शेगाव रोडवर दुचाकीवरून एक इसम हा अवैध रित्या गुटखा नेत असल्याची माहिती मिळताच जलंब पोलीसांनी नाकाबंदी करून प्रसाद सुपडा तळोकार वय 25 वष॔ रा.दसरा मैदान शेगाव याला रंगेहाथ पकडले व त्याचे जवळुन शासनाने प्रतिबंधीत केलेला पान बहार सुगंधीत पान मसाला चे 140  पॅकेट किंमत 31,509रपयाचा माल व एक दुचाकी कमांक M.H.28 B.N.3258 किंमत 80 हजार रुपये व एक मोबाईल किंमत 1 हजार रुपये असा 1लाख 12 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

         असुन आरोपी विरुद्ध अप.नं.10/2022 कलम 328,188,273 भादवि सह कलम 26 (2)(iv) अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 शिक्षा कलम 59 अनवे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहेत.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया,अप्पर पोलीस अधीक्षक श्रवन दत्त, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जलंब पोलीस रटेशनचे ठाणेदार धिरज बांडे ,पोलीस उपनिरीक्षक राहुल काटकाडे , पोहेका तुकाराम इंगळे, पोका उध्दव कंकाळे,पोका गोपाल सोनवणे यांनी केली आहे.