वैजापूर- भारती कदम
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाची पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली घेण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी, एम आय एम, मनसे तसेच छोट्या-मोठ्या समविचारी संघटना सोबत घेऊन तालुक्यातील जनतेला सक्षम पर्याय म्हणून उमेदवार देण्यासाठी सकारात्मक चर्चा चालू असल्याचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांनी सांगितले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक च्या कामाला लागावे अशा सूचना ज्ञानेश्वर घोडके यांनी यावेळी दिल्या.तालुक्यातील सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेत्यांवर त्यांनी सडकून टिका केली.
सर्वच राजकीय पदाधिकारी मिळून मिसळून राजकारण करून सत्ता. भोगत आहेत.त्यांनी जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा आरोप त्यांनी केला.प्रहार संघटना राज्यात सत्तेत सहभागी असली तरी स्थानिक पातळीवर मात्र प्रहार ही सक्षमपणे तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांवर उमेदवार समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूकीस सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी प्रहारचे गणेश सावंत ,विशाल शिंदे ,नितीन तांबे ,आकाश गाडेकर ,अमोल रोठे,मोबिन खान ,काकासाहेब पडवळ,शाकीर शेख ,सागर गुंड ,दीपक आधुडे,मकसूद शेख, ज्ञानेश्वर तुरकणे प्रवीण मगर ,उमेश दुबे,विजय शिंदे ,अमोल शिंदे,सागर घोडके ,अझहर शेख, रफीक खान ,बाबासाहेब मोटे, जितू फाळके, संदीप शेटे ,इब्राहिम शेख ,चांगदेव पवार,दादासाहेब होले,विकास गाढे,रमेश बारसे हमजा शहा ,गणेश तुपे,सलीम पठाण ,रामेश्वर गाडेकर ,दत्ता सोनवणे,सागर डघळे,नवनाथ त्रिभुवन,विशाल दुबे ,सुनील मतसागर,मुजाहिद पठाण,गणेश कटारे आदींसह कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.