वैजापूर भारती कदम प्रतिनिधि
वैजापूर- मोटारसायकल वर दारू विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली.विलास गुलाब त्रिभुवन (२१) रा.दत्तनगर वैजापूर असे आरोपीचे नाव आहे.शहरात बेकायदा दारू विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.त्याआधारे पोलीसांनी ही कारवाई केली.त्याच्या ताब्यातून मोटार सायकल व देशीदारू असा एकूण ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार सुनील खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास त्रिभुवन याच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस नाईक गवळी हे करीत आहेत.