वैजापूर भारती कदम
वैजापूर - तालुक्यातील करंजगाव शिवारातील एका शेतातून चोरट्यांनी दोन लिंबाची झाडे कापून नेल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.या प्रकरणी पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.विमल शेवगण यांची करंजगाव शिवारात गट क्रमांक १२३ मध्ये शेती आहे.ही शेत जमीन त्यांनी गावातील रहिवासी चांगदेव हरीभाऊ गोराडे यांना ११ वर्षांपासून बटाईने लावलेली आहे.शेवगण हे बाहेरगावी राहतात.
त्यांच्या शेतातील विहीरीजवळ असलेली दोन लिंबाची झाडे चोरट्यांनी कापून नेली. या दोन्ही झाडांची किंमत दहा हजार रुपये इतकी आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर गोराडे यांनी ही माहिती शेत मालक शेवगण यांना दिली.त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे सांगितले.त्यानुसार चांगदेव गोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.