वैजापूर भारती कदम
दि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळा किंवा तुकडीवर नियुक्त व 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100 टक्के अनुदान मिळालेल्या कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनीच पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी शिक्षण संघर्ष संघटना, जुनी पेन्शन कोअर कमिटी संस्थापक अध्यक्ष संगीता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर तालुक्याच्या वतीने आमदार सतिष चव्हाण यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी निवेदन देण्यात आले .आमदार चव्हाण यांनी 2005 पूर्वी ज्यांची नियुक्ती दिनांक आहे त्या सर्वांना 100% जुनी पेन्शन योजना लागू होणार अशी ग्वाही दिली. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित अंशता अनुदानित शाळा किंवा तुकडीवर नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदान मिळालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची मूळ नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी ही विनंती करण्यात आली.
जुनी पेन्शन योजना लागू न झाल्यास विधिमंडळाच्या अधिवेशना दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत अविश्वास धरणे आंदोलन करण्यास बसणार आहोत असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी ॲड. देव पवार, वैजापूर तालुकाध्यक्ष बी एम हजारे, सुनील व्यवहारे, महेंद्र नरवडे , सचिन पाटील, संतोष शिंदे, विलास पगार, सुनील साळुंखे , माधुरी गलांडे,सचिन कर्डक, भरत निंबाळकर,दिपक साळवे, काकासाहेब चव्हाण,नितीन शिंदे, प्रशांत जानराव, आलिमोदीन काजी ,सुनील साळुंके, राऊत , जालिंदर बारसे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.