Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रेमविवाह केल्याने एका युवतीचा आई व भावाने कोयत्याने तोडून खुन केल्याची खळबळजनक घटना




 वैजापूर -प्रेमविवाह केल्याने एका युवतीचा आई व भावाने कोयत्याने तोडून खुन केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील गोयगाव येथे रविवारी दुपारी घडली.सैराट चित्रपटाच्या कथानकाशी जुळणारी ही घटना घडल्याने परीसर हादरला आहे.किर्ती उर्फ किशोरी अविनाश थोरे (१९) असे मयत विवाहीत युवतीचे नाव आहे.

        गोयगाव येथील मोटे कुटुंबातील किर्ती हिने २१ जुन २०२१ रोजी गावातीलच  अविनाश संजय थोरे याच्याशी प्रेमविवाह केला होता.हा प्रेमविवाहाला मोटे कुटुंबियांचा विरोध होता.मुलीचे वडील या प्रेमविवाहामुळे चिंताग्रस्त झाले.समाज,गांव व नातेवाईकात मुलीने बदनामी केल्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती.त्यामुळे ते काही दिवसांपासून घरातून निघूनही गेले होते.हा विवाह झाल्यापासून ते घरातून बाहेर पडले नाही.या कारणावरून ते सतत घरात चिडचिड करत असत.तसेच पत्नीलाही दोषी ठरवून मारहाण करत असत.मुलावरही ते राग व्यक्त करत.त्यामुळे किर्ती च्या आई व  भावाने तिचा काटा काढायचा ठरवला.त्यानुसार त्यांनी कट रचला.त्यांनी मुलीच्या घरी येणे जाणे सुरू केले.चार दिवसांपुर्वी किर्तीची आई तिच्या घरी आली होती. त्यादिवशी  तिने तिच्याकडे जेवणही घेतले होते.त्यामुळे किर्ती व तिचा पती अविनाश हे खुश झाले होते.रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास  किर्ती ची आई व भाऊ तिला भेटायच्या निमित्ताने  तिच्या लाडगाव शिवारातील गट नंबर ३०७ मधील शेतातील घरी आले.आपली मोटारसायकल त्यांनी बाजूला लावून दोघेही घरात गेले. त्यावेळी अभिराज हा आजारी असल्याने घरात झोपलेला होता.घरी भाऊ व आई आल्याने किर्ती खुश झाली होती.

   ती लगेच चहा ठेवण्यासाठी  स्वयंपाक घरात गेली.तिच्या पाठोपाठ तिचा भाऊ व आई पण स्वयंपाक घरात गेले.त्यावेळी भावाने कोटा मागे लपवलेला कोयता बाहेर काढला. तसेच आईने तिला धरून ठेवले.त्यावेळी त्याने धारदार कोयत्याने तिच्या मानेवर सपासप वार करून तिचे मुंडके धडावेगळे केले.तसेच रक्ताने माखलेला कोयता व तिचे धडावेगळे केलेले मुंडके हातात धरून तो घराबाहेर आला.त्याचवेळी अविनाश हा पण आवाज ऐकुन जागा झाला.परंतू ही घटना पाहून घाबरला व तेथून पळाला.त्यामुळे त्याचा जीव वाचला.आरोपी आई व भाऊ याने शांतपणे छाटलेले मुंडके ओट्यावर ठेवून निघून गेले.त्यांनी सरळ पोलीस ठाणे गाठून खुनाची कबुली दिली.या सैराट कथानकामुळे परीसर हादरून गेला आहे.घटनेची माहीती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, फौजदार एन बी कदम,इनव्हेस्टीगेशन व्हॅन,श्वान पथक व सहकाऱ्यांनी घटना स्थळी भेट दिली.या प्रकरणी अविनाश संजय थोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शोभा संजय मोटे व संकेत संजय मोटे या दोन जणांविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे हे करीत आहेत.