वैजापूर
जागतिक एड्स सप्ताह निमित्त येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात उपजिल्हा रुग्णालय,प्रेरणा सामाजिक संस्था, व कॉलेजच्या एन एसएस च्या संयुक्त विद्यमाने यांच्या उपस्थितीत महाविद्यालयीन मुला-मुलींना एड्स बाबत व्याख्यान, चित्रप्रदर्शन द्वारे व एड्स तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंद , विद्यार्थी -विद्यार्थिनी यांच्या सह ३३ जनांनी एड्स तपासणी करून घेतली. यावेळी प्राचार्य शिवाजी थोरे, उपप्राचार्य दादासाहेब सांळुके, प्रा भीमराव जाधव,धोंडीरामसिंह राजपूत उपजिल्हा रुग्णालयाचे विजय पाटील राजेंद्र लाठे, वैशाली पंडित शशिकांत पाटील,लक्ष्मीकांत दुबे,साई बारगळ,संजय शिराळे ,प्रेरणा संस्थेच्या मनीषा मुळे, बापू वाळके आदिंची उपस्थिती होती.