जागतिक एड्स दिनानिमित्त वैजापूर येथे उप जिल्हा रुग्णालय व प्रेरणा सामाजिक संस्थेतर्फे चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. एड्स संपवा, असमानता नको, महामारी संपवा अशा घोषणा देत व सामूहिक शपथ घेवून हा कार्यक्रम पडला. चित्रप्रदर्शनचे उदघाटन पोलीस निरीक्षक साम्राटसिंह राजपूत, सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांनी फीत सोडून केले. या प्रसंगी सहायक वैद्यकीय अधिक्षक डॉ.एस. मुंढे,वैद्यकीय अधिकारी डॉ.यशपाल चंदे,डॉ.दीपमाला परदेशी,डॉ.शीतल साळुंके यांची उपस्थिती होती. सामूहिक शपथ वाचन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले.
प्रास्तविक विजय पाटील यांनी केले. आभार प्रेरणा सामाजिक संस्थाचे प्रकल्प समन्वयक साईनाथ बारगळ यांनी केले.या प्रसंगी प्रेरणा सामाजिक संस्थेचे संजय हिंदोळे,मयूर ठोंबरे, सचिन शिंदे,मनीषा जाधव, विजय पाटील, शशिकांत पाटील, पंकज कांबळे, संजय शिराळे, प्रशांत गिरी, राजेंद्र लाठे, रवींद्र गडकरी, सुधीर मगरे, रवी विणकरे,लक्ष्मीकांत दुबे,रामेश्वर नारळे, बापूराव वाळके,व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.