वैजापूर-भारती कदम
विवाहीतेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी तालुक्यातील बळेगाव येथील पती व सासू विरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुजा संतोष दिवेकर (२१) असे मयत महिलेचे नाव आहे. चाळीसगाव येथील मधुकर तुकाराम आळींग यांची मुलगी पुजा हिचे लग्न तिन वर्षापुर्वी वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथील संतोष देविदास दिवेकर यांच्याशी झाले होते.लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.तुझ्या वडीलांनी आम्हाला फसवले.असे म्हणून तिला सतत शिविगाळ करण्यात येऊ लागली.
या छळाला कंटाळून तिने सोमवारी रात्री सावखेड खंडाळा शिवारातील आण्णा जाधव यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणी तिचे वडील मधुकर आळींग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला पती संतोष दिवेकर व सासू लंकाबाई देविदास दिवेकर या दोन जणांविरुद्ध शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास फौजदार योगेश पवार हे करीत आहेत.