वैजापूर - मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू हायस्कूल वैजापूर येथे येत्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यापुर्वी विद्यार्थ्यांसाठी नवीन आठ वर्ग खोल्याचे बांधकामासह आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.त्यामुळे शिक्षकांनी हायस्कूलची शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी केले.शहरातील न्यू हायस्कूल शाळेला त्यांनी शनिवारी सकाळी भेट देऊन शाळा परिसराची पाहणी केली.तसेच शाळेच्या मैदानावर शिव छत्रपती क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजलेल्या अंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांची संयुक्त बैठक घेतली.
या बैठकीला माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, शाळा समितीचे अध्यक्ष भगवान तांबे, पांडुरंग जाधव,विजय कासलीवाल, पांडुरंग जाधव, उल्हास सांळुके,दशरथ बनकर, दिलीप राजपूत, संपत डोंगरे, सुरेश तांबे, प्रकाश माळी, प्रशांत त्रिभुवन,सचिन जोशी, राजेंद्र व्यवहारे, रजा पठाण,प्रा.राहूल साठे,मुख्याध्यापक विद्याधर सोनवणे यांची उपस्थिती होती.आ.चव्हाण म्हणाले शहरातील न्यू हायस्कूल शाळेला पुन्हा शैक्षणिक गुणवत्तेचे केंद्र हा नावलौकिक मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी येत्या काळात विद्यार्थी पटसंख्या वाढ करणे यासह शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यावर प्राधान्याने लक्ष केंद्रित करा असे बजावले.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नववी पासूनच विशेष वर्ग घेण्याच्या सूचना शाळेच्या मुख्याध्यापकांना दिल्या.शाळा समितीचे अध्यक्ष भगवान तांबे यांच्याकडे येथील सर्व शैक्षणिक निर्णयाचे अधिकार दिल्यामुळे कार्यरत शिक्षक, कर्मचा-यांनी त्यांनी दिलेल्या सूचनाचे पालन करावे असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.याप्रसंगी