सावज बसले टपून
शिकार आली हाती
माणसाने फायद्यासाठीच
निर्मियेल्या जाती.
जसा त्याचा व्यवसाय
तशी पडली आडनावे
प्रत्येकजण आपापला
वारसा जपण्या धावे.
धंद्यापुरती नाती
माणसाने फायद्यासाठीच
निर्मियेल्या जाती.
गावामध्ये नोंद तेव्हा
पुरते सुख समाधान
ज्याच्या त्याच्या मुखी
असायचे परमेश्वराने गान
मातीच्या देव्हाऱ्यात जळे
सदा सांजवाती
माणसाने फायद्यासाठीच
निर्मियेल्या जाती.
साजरे होई सण उत्सव
एकत्र गावोगावी
आता मात्र का तो करतो
जातीपातीत लावालावी
सांगा आता कधी संपेल
जातीपातीची साडेसाती
माणसाने फायद्यासाठीच
निर्मियेल्या जाती.
रज्जाक शेख ,श्रीरामपूर