वैजापूर
शहरातील मुख्य चौकातील बर्याच दिवसांपासून बंदीस्त असलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा २६ नोव्हेंबर रोजी खुला करण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या सल्लागार कुसुमताई बागुल,दकिंग आॉफ वर्ल्ड डॉ आंबेडकर ग्रुपचे सिध्दार्थ बागुल यांनी दि २६ नोव्हेंबर पासून येथील नगरपालिके समोर आमरण उपोषण सुरू केले होते. मंगळवार रोजी उपविभागीय अधिकारी माणीक आहेर, वैजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, पोलीस निरिक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी उपोषणार्थी यांची भेट घेऊन वैजापुर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नविन पुतळा बसविण्याचे काम पूर्ण झालेले असुन, राष्ट्रीय महामार्ग एन एच 752 चे काम पुर्ण होण्यास विलंब झाल्याने पुतळ्याच्या कठड्या भोवतीचे काम तीन दिवसापुर्वी नगर पालिके द्वारे पुर्ण करण्यात आले. नगरपालिकेकडून १ जानेवारी २०२२ नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण करण्याचे लेखी आश्वासन देऊन उपोषणकर्त्याचे लिंबू पाणी सरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले.यावेळी पारस घाटे,अमीर सय्यद ज्ञानेश्वर शिरसाठ, गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी विजय भोटकर आदी उपस्थित होते.