Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संतगाडगे बाबा पुण्यतिथी निमित्ताने पुरस्कार वाटप



 भारती कदम

        वैजापूर  येथील साहित्यीक  धोंडीरामसिह राजपूत यांना शब्धगंध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने  साहित्य जीवन पुरस्कार देण्यात आला. प्रसिद्ध साहित्यिक व श्रीरामपूर चे आमदार लहुजी कानडे व पंचायत समिती सभापती डॉ वंदना मुरकुटे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक हा पुरस्कार ठाकूर यांना देण्यात आला.सन्मानपत्र,शाल व साहित्य संपदा देऊन हा पुरस्कार श्रीरामपूर येथे  देण्यात आला

        .या वेळी  साहित्यिक तथा शब्दगंध अहमदनगर च्या अध्यक्ष तथा प्रसिद्ध कवयित्री शर्मिला गोसावी,प्राचार्या गुंफताई कोकाटे,श्रीरामपूर शाखेचे अध्यक्ष शेख  मिरज बक्ष बागवान,लोककवी  आनंदा साळवे,शेख रफीक बागवान, नाट्य कलावंत मुनिर भाई, प्रसिद्ध कवी सुभाष सोनवणे, अयुब पठाण , किरणसिंह राजपूत आदींची उपस्थिती होती.  संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्ताने हा पुरस्कार देण्यात आल्याने  संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत ठाकूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.