वैजापूर
येथील नगर पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी हस्तलिखित संसद भवन फळ्यावर रेखाटले.चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, वक्तृत स्पर्धा, निबंध स्पर्धा या सर्व बाबीतून संविधान च्या विविध कृती सादर केल्या. गौरी राऊत हीने आपल्या हस्तलिखित उद्देशिकेचे लिखान करून सामूहिक वाचन केले.यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक दशरथ बनकर, दिनेश राजपूत,धोंडिरामसिंह राजपूत मुख्याध्यापक जी जी राजपूत,बी बी जाधव,संदीप शेळके,नीता पाटील,राजश्री बंड, सुवर्णा बोर्डे ,ज्योती दिवेकर,लता सुखासे,सुनिता वसावे , रावकर आदींची उपस्थिती होती.