वैजापूर भारती कदम
वैजापूर- शेळ्या व मेंढ्याना पाणी पाजण्याच्या कारणावरून दोघांनी मेंढपाळास लाकडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील नागमठाण येथे गुरुवारी घडली.या प्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील महादेव जानबा कचरे हे मेंढपाळ असून ते मेंढ्या घेऊन तालुक्यातील नागमठाण येथे आले आहे.त्यांनी आपल्या मेंढ्या पाणी पाजण्यासाठी ओढ्यावर आणल्या.त्यावेळी दोन जण तेथे आले.येथे मेंढ्या पाणी पाजू नका.असे म्हणून ते शिवीगाळ करू लागले.त्यावर कचरे हे समजावून सांगू लागले.मुक्या प्राण्यांना पाणी पिऊ द्या.परंतू त्यांनी लाकडाने मारहाण करून कचरे यांचे डोके फोडून जखमी केले.या प्रकरणी महादेव कचरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण रावसाहेब चव्हाण व पवन चांगदेव चव्हाण यांच्या विरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक किशोर आघाडे हे करीत आहेत.