अनंता शिराळकर
शिराळा तालुका जाफ्राबाद येथे बुलढाणा जिल्हा सूर्योदय मंडळ आई संस्कार कलश यांच्या संयुक्त विद्यमाने दि 6/12/2021 रोजी किशोरीन मुलींना आणि मातांना आजच्या ज्वलंत समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले क्रांती मेरत मॅडम यांनी बालविवाह ही एक समस्या आहे व त्याचे मुलींच्या भावी आयष्यावर होणारे विपरीत परिणाम यांवर चर्चा केली किशोरवयीन मुलींची मानसिक व शारीरिक अवस्था व तसेच बाल विवाह प्रतिबंधक कायदा या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले
मनीषा विंचुरकर मॅडम यांनी आत्मरक्षण व ध्येयवाद या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की मुली जेव्हा शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातात तेव्हा न घाबरता आलेल्या प्रसंगांना सामोरे जा प्रसंगी मुलींनी ग्रुप करून अचानक आलेल्या प्रसंगाला हाताळा कु. संपदा मॅडम यांनी या वयात शरीरामध्ये वैज्ञानिक दृष्टीने होणारे बदल येणाऱ्या समस्या यासाठी कुटुंबातील सदस्यांची चर्चा करा शाळेतील शिक्षिकांशी चर्चा करा असे सांगितले .
सौ.लताताई राजपूत मॅडम यांनी कुटुंब ही एक संस्कार शाळा आहे आई-वडील मुलांसाठी काबाडकष्ट करून इस्टेट जमवतात परंतु आज मुलांकडे आपले दुर्लक्ष होत आहे मुलांच्या संसाराकडे लक्ष द्यावे मुली मुले घरातच अनेक गोष्टी शिकतात टी.व्ही .मोबाइल यांचे दुष्परिणाम इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले संपूर्ण सदस्यांनी माता आणि मुलींशी हसत खेळत चर्चा करून त्यांच्या मनातील शंका निरसन केल्या
आजचा कार्यक्रम संपला असे नव्हे यानंतर देखील मुलींना त्यांच्या भावी आयुष्यात येणाऱ्या अडचणी साठी आम्ही तुमच्या सोबत आहोत याची ग्वाही देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या वेळी या कार्यक्रमाला गावातील तरुण मंडळी गावाचे प्रथम नागरिक गावचे सरपंच पंढरीनाथ शिराळकर, रामदास दुनगहू, गजानन शिराळकर, नागोराव दुनगहू , व गावकरी मंडळी उपस्थित होते