वैजापूर- राज्य सबज्यूनीअर बाॅल बॅडमीटन स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी तालुक्यातील नगिना पिंपळगाव येथील सोपानराव कवडे पाटील इंग्लिश स्कूल येथे घेण्यात आली.क्रिडा ज्योत पेटवून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष एस आर बरबंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
१४ डिसेंबर रोजी वसमत येथे राज्य स्तरीय १६ वर्षे वयाखालील खेळाडूंची सब ज्युनिअर बाॅल बॅडमीटन स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड सुरू आहे.यावेळी प्राचार्य जगदीप शिंदे , एस आर बरबंडे व बाॅल बॅडमीटन असोसिएशनचे जिल्हा सचिव अंजूम पठाण यांनी मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन वर्षा नवले यांनी केले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग कवडे,सचिव मुनीर शेख यांचे सहकार्य लाभले.यावेळी काकासाहेब लव्हाळे, शालेय समिती सदस्य काकासाहेब गोरसे,क्रिडा शिक्षक मुनव्वर शेख,करीश्मा मुदीराज ,स्नेहा निकुले,वर्षा जगताप,गार्गी जाधव,शिवाजी डोंगरे,अजयसिंग,गोटीराम फुलारी आदींची उपस्थिती होती.