वैजापूर-शहरातील येवला रोडवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गुटखा विक्री साठी घेऊन जाणाऱ्या एकास पकडले.त्याच्या ताब्यातील मोटार सायकल व ४८ हजार १७५ रुपयांचा गुटखा पोलीसांनी जप्त केला आहे.शेख दानीस शेख रईस रा.येवला असे गुटखा विक्री करण्याचे नांव आहे.
वैजापूर तालुक्यातील अवैध धंदे वर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक राठोड,बागुल यांचे पथक बुधवारी शहरात आले होते.त्यावेळी एक इसम मोटार सायकल वर गुटखा विक्री साठी येत असल्याची माहिती पथकाला मिळाली.त्या आधारे पथकाने ही कारवाई केली.सदर मोटारसायकल (एम एच १५ इ यू ०६०२) वर शेख हा गोणीत गुटखा घेऊन वैजापूरात विक्री करण्यासाठी येत होता.त्याच्या ताब्यातून विवीध कंपन्यांचा ४८ हजार १७५ रुपयांचा गुटखा पोलीसांनी जप्त केला आहे.सदर प्रकरणी अन्न व औषध प्रशासन यांना माहीती कळविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.