वैजापूर भारती कदम
वैजापूर- शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व नगरपरीषदेतील गटनेते यांना एकाने जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी घडली.या प्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.नगरसेवक प्रकाश चव्हाण हे यशवंत काॅलनीत राहतात.त्यांच्या शेजारी दिलीप कुंदे राहतात.दोघांचाही दारू विक्री चा व्यवसाय आहे.त्याच्यातून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद होता. दिलीप कुंदे याच्यावर दारूबंदी विभागाने काही दिवसांपुर्वी कारवाई केली होती.
ही कारवाई चव्हाण यांच्या सांगण्यावरून झाल्याचा कुंदे याला समज होता.या कारणावरून कुंदे हा पत्नीसह चव्हाण यांच्या घरी गेला.तेथे त्यांना शिवीगाळ करू लागला.तसेच त्यांना बाजूला घेऊन जात त्याने जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी प्रकाश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप कुंदे व त्याची पत्नी या दोन जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.