वैजापूर भारती कदम
वैजापूर शहरात करोनामुळे आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू झाला असून, कोव्हीड मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसाला रुपये ५० हजार रुपये सानुग्रह मदत करण्यात येणार आहे.त्यासाठी नगरपालिकेतर्फे युद्ध पातळीवर मोहिम सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या घरी नगर पालिकेचे कर्मचारी भेट देऊन मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मदत करतील.
तसेच त्यांच्या कडून आवश्यक कागदपत्रे यांची पूर्तता करून ऑनलाईन फॉर्म भरून घेणार आहेत. शुक्रवार, १७ डिसेंबर २०२१ पासून ही कार्यवाही युद्ध पातळीवर मोहिम स्वरुपात सुरु केली आहे.वैजापुर शहरात कोवीड मुळे आतापर्यन्त ८४ मृत्यू झालेले आहेत. करोनामुळे मृत्यू पावलेल्या या ८४ नागरिकांच्या वारसांना शासनातर्फे देण्यात येणारी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पालिकेने ही मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संबंधित नागरिक आणि यंत्रणांनी सहकार्य करावे असे आवाहन वैजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांनी केले आहे.