प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर- येथील डॉ. संकेत शिवाजी कुमावत यांनी रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भारत सरकार ची नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम इन मेडिकल सायन्स दिल्ली तर्फे घेण्यात येणाऱ्या फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम डिसेंबर 2021 मधील परीक्षा उत्तीर्ण करून घवघवीत यश मिळवीले. त्यांच्या या यशाबद्दल आमदार रमेश बोरनारे,माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, नगरसेवक स्वप्निल जेजुरकर, गणेश खैरे, सोमनाथ जगदाळे, जालिंदर नारळे,अजय जाधव, गणेश कुमावत, हेमंत कुमावत आदींनी अभिनंदन केले आहे.