वैजापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद , सावित्रीबाई फुले सेवाभावी संस्था, जनहित सेवाभावी संस्था, माऊली सेवाभावी संस्था यांच्या वतीने पंचायत समिती सभागृहात भारतीय संविधान गौरव दिन व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्ताने डॉ राजेंद्र शेजूळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .सुरुवातीस महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .प्रारंभी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मोहन सौंदर्य हे होते. यावेळी डॉ बाळासाहेब लिहिणार, डॉ बाळासाहेब गायकवाड, कृषी अधिकारी एच आर बोयनर , प्रकाश बोथरा ,जे. के. बोरगे, रॉयल धुळे शाहीर अशोक बागुल डॉ.युवराज धबगडे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पठारे यांनी केले. तर आभार जगन गायकवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आबासाहेब जेजुरकर, शैलेश ननावरे, आण्णासाहेब ठेंगडे यांनी परिश्रम घेतले.