औंढा नागनाथ तालुक्यातील देवळा मार्ग अंजनवाडा सिद्धेश्वर मार्गे रस्ता पाच वर्षापासून दुरूस्ती न झाल्यामुळे येथील सार्वजनिक बांधकामाचे जाणून-बुजून दर दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे अनेक वेळा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती परंतु सार्वजनिक बांधकाम अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे वाहनचालक व नागरिक बोलल्या जात आहे.
त्यामुळे या रस्त्यावर पंचवीस ते तीस गावांचा संपर्क आहे तसेच या रस्त्यावर दोन तीर्थक्षेत्र आहे अंजनवाडा महादेव दोन सिद्धनाथ महादेव गंगालवाडी या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते परंतु येथील पाच वर्षापासून रस्ता दुरुस्त कडे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालकांना व नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात रोजच होत आहेत व तसेच तात्काळ रस्ता दुरुस्त करावा वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन रस्ता तात्काळ दुरुस्ती करावा अशी मागणी वाहनचालक आतून व नागरिकांतून होत आहे