वैजापूर भारती कदम
वैजापूर-समृद्धी महामार्गाचे भंगार चोरी प्रकरणात पोलिसांनी एका जणास अटक केली.त्यास गुरूवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अमीर सिराज पठाण (२६) रा.वैजापूर असे आरोपीचे नाव आहे.समृद्धी महामार्गाच्या घायगाव शिवारातील कॅम्प मधून १५ डिसेंबर रोजी रात्री पाच लोखंडी प्लेटा चोरी झाल्या होत्या.
या प्लेटची किंमत ४० हजार रुपये इतकी आहे.या प्रकरणी घायगाव कॅम्पचे सुपरवायझर राम बाबू मिश्रा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी पोलिसांनी शहरातील अमीर सिराज पठाण यांना अटक केली.त्याने गुन्हयाची कबूली दिली असून त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या लोखंडी प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.त्यास येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.