प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर, गारज (ता.वैजापूर) येथे २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकिस आली. रविंद्र गोकुळ वाघचौरे असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे. एकटेपणा व नैराश्यातुन त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रविंद्र हा घरात एकटाच राहत होता. त्यांचे वडील पंधरा वर्षापुर्वी वारले असुन आईचेही चार वर्षापुर्वी निधन झाले आहे. चार बहिणींचे लग्न झाल्याने तो घरात एकटाच राहत होता. सोमवारी मध्यरात्री त्याने घरात गळफास घेऊन जीवन संपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकिस आली. नागरिकांनी घटनेबाबत पोलिसांना कळवले. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.