वैजापूर- दुभाजकाला मोटारसायकल धडकल्याने एका इसमाचा मृत्यू झाला.ही घटना सोमवारी वैजापूर खंडाळा रस्त्यावर खंडाळा शिवारात घडली.समाधान गोविंद आहीरे (४३) रा.भोपळेवाडी ता.कन्नड असे मयत व्यक्तीचे नाव आहे.आहीरे यांच्या तालुक्यातील चांडगाव शिवारात मेंढ्या होत्या.ते चांडगाव येथून गावाकडे जात होते.त्यावेळी खंडाळा गावाजवळ दुभाजकाला मोटारसायकल धडकल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार रज्जाक शेख हे करीत आहेत.